India UAE LPG Deal: UAE सोबत भारताने केला सर्वात मोठा गॅस करार..

इराण-अमेरिका युद्धाच्या भडक्यात मोदींचा मास्टरस्ट्रोक..

देश- विदेश : इराण-अमेरिका युद्धाच्या सर्वात मोठ्या झळा सर्वानसामान्यांना सहन कराव्या लागत आहेत. इराण-अमेरिका युद्धाच्या भडक्यामुळे सध्या जगभरात भीषण ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या युद्धाचा थेट फटका जागतिक तेल आणि वायू पुरवठ्याला बसत असतानाच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) एक छोटा पण अत्यंत धोरणात्मक दौरा करून जगाला थक्क केले आहे. या दौऱ्यात भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत मोठा गॅस पुरवठा करार (LPG Deal) केला आहे.

भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयातदार देश आहे. युद्धकाळात देशातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई भासू नये, म्हणून हा करार गेमचेंजर ठरणार आहे. याशिवाय, भारताच्या पायाभूत सुविधा (Infrastructure) क्षेत्रात, आरबीएल (RBL) बँक आणि सन्मान कॅपिटलमध्ये यूएई तब्बल ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची (सुमारे ४१ हजार कोटी रुपये) महागुंतवणूक करणार आहे.

अबू धाबीमध्ये पीएम मोदींचे स्वागत अत्यंत शाही थाटात करण्यात आले. यूएईच्या बलाढ्य ‘F-16’ फायटर जेट्सनी मोदींच्या विमानाला हवेतच सुरक्षा गराडा (Escort) घातला. त्यानंतर त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. मोदींनी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *