सर्वसामान्यांना काय फायदा काय तोटा?..
देश : सद्या सोने- चांदी घ्यायचं म्हटलं की, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासं होत. त्यातच आता या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात मोठा भूकंप येणार असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच उसळण आली आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असल्याने परदेशी चलन वाचवण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणामही देशांतर्गत सोन्याच्या दरावर झाला आहे. या आठवड्यातही सोन्याच्या दरात भूकंप येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सराफा बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रचंड पडझडीचा किंवा मोठ्या दरवाढीचा ठरू शकतो. बाजार विश्लेषकांच्या अंदाजानुसार, या आठवड्यात सोने आणि चांदीच्या (Gold-Silver Price) दरात कमालीची अस्थिरता आणि मोठे चढ-उतार पाहायला मिळतील. भारत सरकारने चांदीच्या आयातीवर घातलेले नवीन निर्बंध, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील बदल आणि युएस-इराण (US-Iran) यांच्यातील वाढता तणाव ही यामागील मुख्य कारणे आहेत.
जागतिक घडामोडींमुळे या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष चीनचे आर्थिक आकडे, अमेरिकेचा हाउसिंग डेटा, पीएमआय (PMI) डेटा, साप्ताहिक जॉबलेस क्लेम्स आणि फेडरल रिझर्व्हच्या ‘FOMC’ बैठकीच्या मिनिट्सवर असणार आहे.

