काय आहे EMI अन् पगाराचा सुपर फॉर्म्युला?
मुंबई: स्वतःच घर असणं हे सर्वांचाच स्वप्न असतं. प्रत्येक जण याच साठी झटत असत की आयुष्यत त्यांचं एक हक्काचं असं स्वतःच घर असाव. पण तुम्हाला हे माहिती आहे का? किती पगार असल्यावर घर खरेदी करावं? EMI, घरखर्च सर्व कसं मॅनेज करावं? मात्र सध्याच्या वाढत्या घरांच्या किंमती, महागाई आणि मर्यादित पगारामुळे हे स्वप्न अनेकांना दूरचे वाटू लागले आहे. शहरांमध्ये घरांच्या किमती झपाट्याने वाढत असताना “घर खरेदी करावे की भाड्याच्या घरात राहणे अधिक फायदेशीर आहे?” हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.
याचे उत्तर थेट तुमच्या मासिक उत्पन्नात आणि आर्थिक नियोजनात दडलेले आहे. कारण तुमचा पगार किती आहे, तुम्ही किती कर्ज फेडू शकता आणि घरासाठी किती डाउन पेमेंट करू शकता, यावरच घर खरेदीचा निर्णय अवलंबून असतो.
घर खरेदीचा विचार करताना सर्वप्रथम दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तुमचा पगार आणि तुम्हाला घ्यायचे असलेले घर किती किमतीचे आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, होम लोनचा ईएमआय हा मासिक पगाराच्या २० ते २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
जर तुमचा पगार दरमहा १ लाख रुपये असेल, तर तुम्ही साधारण २५ हजार रुपयांपर्यंतचा ईएमआय सहजपणे भरू शकता. मात्र जर तुमचा पगार ५० ते ७० हजारांच्या दरम्यान असेल आणि ईएमआय २५ हजार रुपये असेल, तर तो आर्थिकदृष्ट्या धोकादायक निर्णय ठरू शकतो.

