विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ! NEET परीक्षा रद्द..

पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना परत द्यावी लागणार परीक्षा..

विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बाब समोर आली आहे. पेपर फुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली असून आता विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणार आहे. पेपर लीक झाल्यामुळे NAT ने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पेपरफुटीनंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यामुळे अंदाजे १० लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा ३ मे रोजी देशभरात घेण्यात आली होती. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार आहे.

देशभरातली 10 लाख विद्यार्थ्यांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. नीट पेपर रद्द कऱण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. विद्यार्थ्यांना पेपर पुन्हा द्यावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नीटचा पेपर टेलिग्रामवर फुटला होता. परीक्षेआधीच पेपर विद्यार्थ्यांच्या हातात कसा आला याची चौकशी केली जाणार आहे. नीटसारखा पेपर फुटणे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्टी आहे. ४२ तास आधीच हा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला होता.

यामागे नेमकं कोण आहे? कुणाचा हात आहे याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पेपर रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आणि पेपर कधी घेतले जाणार या सगळ्याबाबत काय निर्णय होणार याकडे मुलं आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *