जगातील सर्वात मोठ्या कृषी पुरस्काराने पंतप्रधानांचा सन्मान!..

FAO ने दिलं Agricola मेडल..

देश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२६ सालासाठी Food and Agriculture Organization (FAO) कडून दिला जाणारा सर्वोच्च ‘ॲग्रिकोला पदक’ सन्मान प्रदान करण्यात आला आहे. कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा जागतिक सन्मान देण्यात आला. इटलीतील रोम येथे असलेल्या एफएओ मुख्यालयात विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कृषी क्षेत्रातील योगदानाची जागतिक पातळीवर दखल
या समारंभाला जगभरातील कृषी आणि अन्न क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. भारतात कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची दखल घेत एफएओने पंतप्रधान मोदींना हा सन्मान जाहीर केला.

‘ॲग्रिकोला पदक’ का मिळाले?
एफएओच्या महासंचालकांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करताना सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या कार्यामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली. अन्न सुरक्षा अधिक मजबूत झाली. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कल्याण सुधारले. तसेच, भूक आणि गरिबीविरुद्धच्या जागतिक लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचेही त्यांनी नमूद केले. शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) पूर्ण करण्यासाठी भारताचे योगदान उल्लेखनीय असल्याचे एफएओने म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *