Fuel Crisis: पेट्रोलबाबत सरकारकडून आनंदाची बातमी..

देशांतर्गत इथेनॉल उत्पादन क्षमतेचा वापर लक्षणीयरीत्या वाढेल..

देश : इंधन टंचाईचं संकट भारतावर असून नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण दिसून येतंय. त्यातच आता पेट्रोलबाबत सरकारकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एका नव्या क्रांतीला सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीचा मोठा भार कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. जगभरातील बदलती भू-राजकीय परिस्थिती आणि तेलाच्या किमतींमधील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर, भारताने देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक सुपर स्ट्रॅटेजी तयार केली आहे.

देशभरात सध्या लागू असलेल्या २० टक्के इथेनॉल मिश्रण (E20) इंधन धोरणाच्या पलीकडे जाऊन, ३० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्यासाठी आवश्यक असलेला तांत्रिक पाया आता अधिकृतपणे निश्चित करण्यात आला आहे. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (BIS) १८ मे रोजी एक अधिसूचना जारी करून उच्च-श्रेणीतील इथेनॉल मिश्रण E22, E25, E27 आणि E30 साठी नवीन गुणवत्ता मानकांची घोषणा केली आहे.

हे नवीन इंधन प्रकार आहेत, ज्यात पेट्रोलमध्ये अनुक्रमे २२%, २५%, २७% आणि ३०% इथेनॉल असते. या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे की, हे नवीन महत्त्वपूर्ण नियम १५ मे २०२६ पासून अधिकृतपणे लागू करण्यात आले आहेत. सध्या पश्चिम आशियामध्ये युद्धाचे वातावरण तीव्र आहे. जगातील २० टक्के तेल पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’सारख्या महत्त्वाच्या जलमार्गाच्या बंद होण्यासारख्या संकटांमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात गंभीर व्यत्यय येत आहे.

केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे परदेशी तेलावरील आपले अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे देशांतर्गत इथेनॉल उत्पादन क्षमतेचा वापर लक्षणीयरीत्या वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *