‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ची देशव्यापी चाचणी..

देश: तुमचा फोन अचानक वाजला आहे का? तर घाबरू नका. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संयुक्तपणे ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ची देशव्यापी चाचणी घेत आहेत. या काळात मोबाईल वाजल्यास सतर्कतेचे संदेश मिळू शकतात. तुम्हाला असा मिळाल्यास घाबरण्याची गरज नाही. ही एक चाचणी आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २ मे रोजी या देशव्यापी मोबाईल-आधारित आपत्ती सूचना प्रणालीचे उद्घाटन केलं आहे. त्यानुसार नवीन सेवा लागू झाली आहे.
आलेल्या मेसेजमध्ये म्हंटले आहे. भारताने आपल्या नागरिकांना आपत्तीची त्वरित सूचना देण्यासाठी, पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘सेल ब्रॉडकास्ट’ सेवेचा शुभारंभ केला आहे. जागृत नागरिक, सुरक्षित राष्ट्र. हा संदेश प्राप्त झाल्यावर जनतेने कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. हा केवळ एक चाचणी संदेश आहे. – भारत सरकार. असं सांगण्यात आला आहे.
चाचणी दरम्यान, फक्त त्या वापरकर्त्यांनाच संदेश मिळेल ज्यांनी त्यांच्या फोनवर हे सेटिंग सक्षम केले आहे. तसेच, लक्षात ठेवा की हा संदेश वारंवार दिसू शकतो. जर तुमच्या फोनवर हे सेटिंग सक्षम केलेले नसेल, तर तुम्हाला अलर्ट संदेश मिळणार नाही. संदेश मिळाल्यावर फक्त ओके (OK) बटण दाबा.

