कांद्याचा प्रश्न गंभीर ?
नाशिक: राज्यात सध्या कांदा दराचा प्रश्न चांगलाच पेटला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या चांदवड येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा क्रांती मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनानंतर राज्य सरकारही ॲक्शन मोडमध्ये आले असून कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्या नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
चांदवड येथील आंदोलनावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी कांद्याचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य केले. “कांद्याचे भाव घसरल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी आम्हाला पूर्णपणे माहिती आहेत, असे ते म्हणाले.

