Petrol Diesel price Hike: पेट्रोल डिझेलच्या दरात 10 दिवसांत सलग चौथ्यांदा वाढ..

काय आहेत नवे दर..

सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठी दरवाढ केली आहे. सलग चौथ्यांदा ही दरवाढ मागच्या 10 दिवसांमध्ये केली आहे. तर सलग दुसऱ्यांदा ही मोठी दरवाढ केल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे रोजी 3 रुपयांहून अधिक पेट्रोल डिझेल महाग झालं होतं. त्यानंतरची दरवाढ ही कमी होती, आता 2 रुपयांहून अधिक दरवाढ करण्यात आली आहे.

देशात पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 2.61 रुपयांची, तर डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 2.71 रुपयांची थेट वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम म्हणून ही दरवाढ झाल्याचे बोलले जात आहे. नव्या दरवाढीनंतर देशातील प्रमुख चार मेट्रो शहरांतील इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. आजचे देशातील चार प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर काय आहेत.

पेट्रोलचे नवे दर
मुंबई: 111.21 (+2.72) रुपये प्रति लिटर
कोलकाता: 113.51 (+2.87) रुपये प्रति लिटर
चेन्नई: 107.77 (+2.46) रुपये प्रति लिटर
दिल्ली: 102.12 (+2.61) रुपये प्रति लिटर

डिझेलचे नवे दर
कोलकाता: 99.82 रुपये प्रति लिटर
चेन्नई: 99.55 (+2.57) रुपये प्रति लिटर
मुंबई: 111.21 (+2.72) रुपये प्रति लिटर
दिल्ली: 95.20 (+2.71) रुपये प्रति लिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *