लालपरीचा प्रवास आणखी महागणार?..

इंधन दर वाढीचा भडका..

महाराष्ट्र: तुम्ही जर लालपरीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाचाही आहे. गेल्या काही काळात इंधन दरांत वाढ झाली असून डिझेलच्या दरांचा भडका उडाला आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास देखील लवकरच महागणार आहे. एसटीची भाडेवाढ विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मात्र, ही भाडेवाढ तातडीने लागू करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आधीच आर्थिक अडचणीत आहे. त्यात डिझेलचे दर वाढल्यामुळे आणखी आर्थिक फटका बसू शकतो. डिझेलच्या दरात शुक्रवारी 3.10 रुपयांनी वाढ झाली. आता पुन्हा यात 91 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचे दर 92 रुपयांच्या पार गेले आहेत. यामुळे एसटीच्या खर्चात दररोज सुमारे 33.70 लाखांची वाढ होत आहे. त्यामुळे महिन्याला 10 कोटी रुपये आणि वार्षिक 124 कोटी रुपयांचा फटका एसटीला बसणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

त्यामुळे आता लालपरीचा प्रवास आणखी महागणार असल्याचं बोललं जात आहे. याचा फटका आता सर्वसामान्यांना बसणार असून ही भाडेवाढ तातडीने लागू करणार नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *