Ration Card: ४५ हजार रेशन कार्डधारक कुटुंबांना मिळणार मोफत साड्या.

पण कोणत्या जिल्ह्यात? सविस्तर पाहा..

ठाणे: रेशन कार्डधारकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या नव्या उपक्रमांतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी देण्यात येणार असून, ठाणे जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना थेट लाभ मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या पुढाकारातून ‘कॅप्टीव्ह मार्केट’ योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांमधील एकूण ४८ हजार ७०४ अंत्योदय कुटुंबांना मोफत साडी देण्यात येणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

अंत्योदय योजनेअंतर्गत आधीच मोफत अन्नधान्य दिले जाते. आता त्यात भर म्हणून मोफत साडीचा समावेश करण्यात आला आहे. या साड्यांसोबत कापडी पिशवीही देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक वस्तूंची मदत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *