Petrol Diesel Price Hike: पेट्रोल २८ रुपयांनी महागणार?

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण..

देश : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकाला आणखी एक मोठा बसणार आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याची चर्चा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. पाच राज्यांतील निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’च्या एका रिपोर्टमध्ये मतदान संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात २५ ते २८ रुपयांची दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या अहवालानंतर एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आता पेट्रोलियम मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सरकारची भूमिका काय?

पेट्रोलियम मंत्रालयाने इंधन दरवाढीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मंत्रालयाने स्पष्ट केले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. सोशल मीडियावर किंवा अहवालांमध्ये फिरणाऱ्या दरवाढीच्या बातम्या चुकीच्या आणि निराधार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलपुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. त्यातच आता पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होण्याच्या चर्चेने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *