अमेरिका- इराण इराक युद्ध कायम?

अमेरिका- इराण इराक युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभर दिसून येताय. त्यात सर्वात मोठी झळ जर कोणाला बसत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना. आधी पेट्रेल, डिझेल, गॅस सिलेंडर, महागाईने त्रस्त असलेला सामान्य नागरिक दिवसानुदिवस अधिकच अडचणीत सापडतो आहे.
त्यातच आता इराणकडून जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेने युद्धविराम वाढवला असला तरी तणाव कायम, स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्सच्या गनबोटने जहाजावर गोळीबार करून कंट्रोल रुम उद्ध्वस्त केली आहे.
अमेरिकेनं युद्धविरामाची मुदत वाढवली असली तरी अजून टेन्शन संपलेलं नाही. हे सगळं म्हणेपर्यंत पुन्हा एकदा होर्मुझमध्ये तणाव वाढला आहे. इराणकडून जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये पुन्हा एकदा जहाजावर गोळीबार करण्यात आला. यावेळी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्सच्या गनबोटने एका जहाजावर तुफान फायरिंग केलं. यामध्ये जहाजाचं अख्खं कंट्रोल रुम उद्ध्वस्त झालं आहे.
दरम्यान आता पुन्हा एकदा इराणकडून जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला असल्याने याचा आता सर्वसामान्यांना काय फटका बसणार याकडे सर्वांचेच लक्ष असून हे युद्ध कधी थांबणार असा प्रश्न देखील सर्वांचं पडला आहे.

