
महत्त्वाचे पुरावे लागले असून निरज जाधवने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे ‘स्पाय ऑपरेशन’ राबवल्याचे समोर आले आहे.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, निरज जाधव याने मुंबईतील फोर्ट परिसरातील प्रसिद्ध मनिष मार्केटमधील हेवन कलेक्शन या दुकानातून हे सर्व तांत्रिक साहित्य खरेदी केले होते. यात त्याने 1 स्पाय कॅमेरा, 1 हिडन कॅमेरा, 64 जीबीचा पेनड्राईव्ह आणि रेकॉर्डिंग सुरू ठेवण्यासाठी पॉवर बँक खरेदी केली होती. ही खरेदी करताना त्याने कोणालाही संशय येऊ दिला नाही, मात्र SIT ने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या खरेदीचा माग काढला आहे.

