महाराष्ट्र सरकारची ‘लेक लाडकी’ योजना.
महाराष्ट्र: तुमच्या घरात चिमुकलीचा जन्म झालाय का? मग महाराष्ट्र सरकार तिला देणार आहे पूर्ण 1 लाख 1 हजार रुपये! हो, तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी या योजनेअंतर्गत तुमच्या लाडक्या लेकीला 1 लाख 1हजार रुपये मिळणार आहेत. राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून हि योजना सुरु करण्यात आली असून पुणे जिल्ह्यात 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या 9 हजार 482 मुलींना मागील 3 वर्षात 4 कोटी 74 लाख 10 हजार रुपये देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे. तसेच या योजनेला पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.
5 टप्प्यात मिळणार रक्कम:
जन्मानंतर: ₹ 5,000
इयत्ता 1 लीत: ₹ 6,000
इयत्ता 6 वीत: ₹ 7,000
इयत्ता 11 वीत: ₹ 8,000
18 वर्षे पूर्ण झाल्यावर: ₹ 75,000
पात्रता काय :
1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली मुलगी .
कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक .
वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
अर्ज कुठे करावा:
पात्र अर्जदार जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालयात अर्ज करू शकतात
ही रक्कम तुम्हाला 5 टप्प्यात मिळेल म्हणजे जन्मानंतर लगेच 5,000 रुपये. पहिलीत गेल्यावर 6,000. सातवीत 7,000 तर अकरावीत गेल्यावर 8,000 रुपये आणि जेव्हा तुमची लेक 18 वर्षांची होईल, तेव्हा तिला मिळतील थेट 75,000 रुपये! यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.

