Summer skincare : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी ?

खास ‘समर स्किन केअर टिप्स..

सध्या राज्यासह देशभरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे केवळ शरीरालाच नाही, तर आपल्या त्वचेलाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात त्वचा काळवंडणे (Tanning), मुरुम येणे, रॅशेस आणि कोरडेपणा या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढतात. या समस्या टाळण्यासाठी आणि उन्हाळ्यातही त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यातील ‘स्किन केअर’ मध्ये खालील गोष्टींचा समावेश असणे अनिवार्य आहे:

सनस्क्रीनचा वापर विसरू नका: उन्हात बाहेर पडण्यापूर्वी किमान २० मिनिटे आधी ३० किंवा त्यापेक्षा जास्त SPF असलेले सनस्क्रीन लावावे. घराबाहेर असताना दर दोन ते तीन तासांनी ते पुन्हा लावणे फायदेशीर ठरते.

भरपूर पाणी प्या: उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा. नारळपाणी, ताक आणि लिंबू सरबत यांसारख्या नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करा.

चेहरा स्वच्छ धुवा: घामामुळे चेहऱ्यावरील छिद्रे बंद होऊन मुरुम येऊ शकतात. त्यामुळे दिवसातून किमान दोन ते तीन वेळा थंड पाण्याने आणि सौम्य फेसवाॅशने चेहरा स्वच्छ धुवावा.

सौम्य मॉइश्चरायझर: उन्हाळ्यात त्वचा तेलकट वाटत असली तरीही मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. तेलकट त्वचेसाठी जेल-बेस्ड किंवा वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर करावा.

आहार आणि घरगुती उपाय: आहारात काकडी, टरबूज आणि संत्री यांसारख्या पाणीदार फळांचा समावेश करा. रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर (Aloe Vera Gel) लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो.

विशेष टीप: सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उन्हात जाणे टाळा. बाहेर पडताना स्कार्फ, टोपी आणि गॉगलचा वापर करून सूर्याच्या अतिनील किरणांपासून स्वतःचा बचाव करा. योग्य काळजी घेतल्यास कडक उन्हातही तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *