
मुंबई: गॅस सिलेंडरवर त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते असं अनेकांना वाटतं. पण गॅस सिलेंडरवर लिहिलेल्या कोडचा संबंध त्याच्या एक्सपायरी डेटशी नसतो. तर त्याच्या टेस्टिंग डेटशी असतो. एलपीजी सिलेंडरची निर्मिती खुप कठोर बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा मानकांनुसार तयार केले जातात, जेणेकरून ते उच्च दाब सहन करू शकतील. या सिलेंडरच्या हँडलवर छापलेले अल्फा-न्यूमेरिक कोड जसं की, ( A 26 या B 27) लपलेले असतात, ते सांगतात की, सिलेंडरला पुढच्यावेळी कोणत्या तारखेला सेफ्टी टेस्टसाठी पाठवलं गेलं पाहिजे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने 2007 मध्येच एक सर्कुलर जारी करुन सांगितलं होतं की, एलपीजी सिलेंडरची वैधानिक तपासणी आणि पेंटिंगसाठी एक निश्चित कालावधी ठरवला जातो. सिलेंडरवर लिहिलेला कोड याच सीमेला दर्शवतो. ज्यामुळे डिस्ट्रीब्यूटर आणि कंपनीला कळतं की, कोणतं सिलेंडर कधी तपासासाठी लॅबमध्ये पाठवायचंय. हा कोड एक्सपायरी डेट नसतो.
आपण या प्रिंटेड कोडला डिकोड केलं. तर यात इंग्रजीचे चार अक्षर A, B, C आणि D चा वापर केला जातो. हे चार अक्षर एक कॅलेंडर वर्षाच्या चार वेगवेगळ्या तिमाही दर्शवते. म्हणजे A म्हणजे पहिली तिमाही, B म्हणजेच दुसरी तिमाही म्हणजेच एप्रिल ते जून, C म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाही असते.
अक्षरांसोबत लिहिलेल्या अंकामध्ये ज्या वर्षी सिलेंडरची पुढील तपासणी होणं गरजेचं आहे ते लिहिलेलं असतं. तुमच्या घरात ठेवलेल्या सिलेंडरवर ‘A 26’ लिहिलं असेल तर 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये सिलेंडर टेस्टिंगसाठी पाठवलं पाहिजे. तसंच एखाद्या सिलेंडरवर ‘B 27’ लिहिलं असेल तर 2027 च्या दुसऱ्या तिमारीत या सिलेंडरची तपासणी गरजेची आहे असा अर्थ निघतो.

