१५ जूनपासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार..

पगारातून कट होतील जास्त पैसे?..

देश : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. दुर्लक्ष कराल तर नुकसान होईल. 15 जूनपासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. 5 नियम तुम्हाला माहिती हवेत, यामध्ये लेट पेमेंट फीपासून ते अगदी व्याजदरापर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत. ज्याचा थेट तुमच्या पगारावर परिणाम होणार आहे.

जर तुम्हीही शॉपिंग, फिरण्यासाठी किंवा पेट्रोल भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा सर्रास वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारी आहे. पुढील आठवड्यात म्हणजेच १५ जून २०२६ पासून क्रेडिट कार्डचे ५ मोठे नियम बदलणार आहेत. खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक इंडसइंड बँक आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल करत आहे.

सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल Interest Calculation करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार, जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलाची पूर्ण रक्कम न भरता फक्त आंशिक भुगतान किंवा मिनिमम ड्यु भरला, तर उर्वरित थकीत रकमेवर व्याज चालूच राहील.

इतकंच नाही, तर थकीत रक्कम असेपर्यंत तुम्ही जे काही नवीन खरेदीचे व्यवहार कराल, त्यावरही व्याज आकारलं जाईल. आधी थकीत रक्कम पूर्ण भरल्यानंतर पुन्हा व्याजमुक्त कालावधीसुरू व्हायचा. पण आता, सलग दोन स्टेटमेंट सायकल्सचे पूर्ण बिल वेळेवर भरल्याशिवाय तुम्हाला व्याजमुक्त कालावधीचा फायदा मिळणार नाही.

बँकेने विविध क्रेडिट कार्ड्ससाठी इंधन व्यवहारांवरील शुल्काची मर्यादा कमी केली आहे. आता स्टँडर्ड टियर कार्ड्सवर एका स्टेटमेंट सायकलमध्ये ३०,००० रुपयांपेक्षा जास्त पेट्रोल-डिझेल भरल्यास १ टक्का अधिक जीएसटी (GST) शुल्क द्यावे लागेल. पूर्वी ही मर्यादा ५०,००० रुपये होती. ‘टायगर क्रेडिट कार्ड’ सारख्या प्रीमियम कार्ड्ससाठी ही मर्यादा ५०,००० रुपयेच राहील, तर पायनियर प्रायव्हेट आणि सॉलिटेअर कार्ड्सना या शुल्कातून सूट असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *