RBI चा EMI संबंधी मोठा निर्णय!.

तुमच्या EMI वर काय होणार परिणाम?..

RBI ने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम बँका, लोन घेणारे आणि तुमच्या आमच्या खिशावर होणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, CNG, खाद्य तेलाच्या किंमतीपासून ते अगदी भाजी पाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. त्यातच वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला असताना RBI ने मोठा निर्णय घेतला आहे.

RBI ची तीन दिवस मॉनिटरी पॉलिसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये रेपो रेट वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली असून तूर्तास सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या महागाईमध्ये रेपो रेट वाढवण्यात आलेला नाही. तो आहे तसाच स्थिर ठेवण्यात आला आहे. दर तीन महिन्यांनी RBI ची यासंदर्भात बैठक घेतली जाते. मागच्या मिटिंगप्रमाणे याही मिटिंगमध्ये रेपो रेट न वाढवण्यावर RBI ठाम आहे.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण विरुद्ध अमेरिका सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक दृष्टिकोन अनिश्चिततेच्या छायेत आहे. ऊर्जा दरांमधील मोठी वाढ आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय आर्थिक घडामोडींना अडथळा आणत आहेत आणि जगभरातील अर्थव्यवस्थांसमोर आव्हाने उभी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *