Nida Khan Arrest : TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खान अखेर अटकेत!

मास्टरमाइंड निदा खान पोलिसांच्या ताब्यात..

नाशिक: नाशिकमधील प्रसिद्ध TCS कॉर्पोरेट कंपनीमध्ये धर्मानंतरचा प्रकार उघडकीस आला आणि सर्वत्र एकाच खळबळ उडाली. या सर्व प्रकरणाची खरी मास्टरमाइंड होती ती म्हणजे निदा खान. गेल्या 40 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढणाऱ्या निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेली 40 दिवस निदा कुठं होती? तिला आश्रय कुणी दिला होता? असा सवाल विचारला जात होता. अशातच नाशिक धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ही संभाजीनगर एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात राहिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी कडक पाऊल उचललं आहे.

निदा खान प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगर येथील MIM नगरसेवक मतीन पटेल याला पोलिसांनी सह आरोपी केलं आहे. नाशिक मधील बलात्कार, धर्मांतर, ॲट्रॉसिटी गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या निदा खानला मतीन पटेल यानं आश्रय दिल्याचा आरोप केला जात आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणामध्ये संभाजीनगरचा MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्ये हा गुन्हा दाखल केला गेलाय.

मतीन पटेल यांना पोलिसांनी नोटीस बजवल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली होती. तसेच पोलीस मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त करून करणार चौकशी देखील करणार असल्याची समोर आली होती. ज्या भागातून नीदा खान हिला अटक करण्यात आली त्या वार्डाचे मतीन पटेल नगरसेवक आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात MIM च्या अडचणी वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *