Amravati Case: परतवाड्याच्या अयानला घडली अद्दल!

पोलिसांनी भररस्त्यात काढली धिंड..

अमरावती: 180 तरुणी आणि साडेतीनशे अश्लील व्हिडिओ! नाशिक TCS प्रकरण ताज असतांनाच आणखी एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आल. अमरावतीच्या परतवाड्यात राहणारा हा फक्त 19 वर्षांचा मुलगा! अकरावीत शिकणारा अयान शेख. या अयान ने असं काही केलंय की हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 180 तरुणींचे साडेतीनशे अश्लील व्हिडिओ या नराधमाने काढलेत.

आधी मैत्री मग प्रेम आणि त्यानंतर मग ब्लॅकमेलिंग! फक्त 19 वर्षांच्या या मुलाने ‘बॉडी काउंट’च्या शर्यतीत अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. स्नॅपचॅट आणि इंस्टाग्रामवर ओळख वाढवून, गुंगीचं औषध देऊन किंवा भीती दाखवून हे व्हिडिओ शूट केले जायचे. धक्कादायक म्हणजे पुढच्या वेळी येतांना तुझ्या मैत्रिणीला पण सोबत घेऊन ये नाही तर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देऊन हे रॅकेट चालत असल्याचं उघडकीस आलं.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केल्यानंतर, दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी अचलपूर शहरात त्याची भररस्त्यातून धिंड काढण्यात आली. यावेळी आरोपी अयानला धड चालताही येत नसल्याचं दिसून आलं. उतरेला चेहरा, मान खाली घालून लंगडत चालत असलेला अयान दिसला. आरोपी अयान अहमद याला आज तपासाच्या निमित्ताने अचलपुरातील सरमसपुरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

तपासाचा एक भाग आणि गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण व्हावी या उद्देशाने पोलिसांनी सरमसपुरा पोलीस ठाण्यापासून ते अयानच्या घरापर्यंत त्याला पायी चालत नेले. धक्कादायक म्हणजे हा नराधम MIM चा माजी पदाधिकारी होता. अयान आता पोलिस कोठडीत असून त्याच्या घरावर बुलडोजरही चालवण्यात आलाय. पण महाराष्ट्रात चाललेल्या या संपूर्ण प्रकरणामुळे तरुणींच्या पालकांमध्ये मात्र भीतीच वातावरण निर्माण झाल असल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *