Donald Trump Iran Deal Warning : बुधवारपर्यंत करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्ब पडणार; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट युद्धाची धमकी

इराण आणि इस्रायाल-अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस आणखी वाढत चालला आहे. शस्त्रसंधीच्या चर्चा आणि चर्चेच्या फेऱ्या होत असल्या तरी आशादायक असा तोडगा निघत नसल्यानं जगाचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं त्यांची भूमिका बदलत आक्रमक विधानं करत आहेत. या पार्श्वभूमीवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी ट्रम्प खोटारडे असल्याचं म्हटलंय. या चर्चेतून अमेरिका युद्ध जिंकू शकणार नाही आणि कोणता तोडगाही निघणार नाही असं गालिबाफ म्हणालेत.

मध्य पूर्वेतील संघर्ष कमी होण्यासाठी पाकिस्तानकडून मध्यस्थी केली जात आहे. मात्र याला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. पाकिस्तानमध्ये चर्चेला इराणचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी ट्रम्प यांच्या बदलत्या भूमिकांवर टीका केलीय. ते म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले. अशा खोट्या दाव्यांमुळे काहीच फायदा होणार नाही. ना अमेरिका युद्ध जिंकेल, ना चर्चेतून तोडगा निघेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *